पंचगंगेच्या पातळीत चढउतार, जाणून घ्या जिल्ह्यातील सद्यस्थिती

  


जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र, शनिवारच्या तुलनेत पाऊस कमी होता. परिणामी, दिवसा पंचगंगेची कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे पातळी २१ फूट ३ इंच होती. ती रात्री १२ वाजता २० फूट ८ इंच झाली होती. रात्री आठपर्यंत नऊ बंधारे पाण्याखाली होते.दरम्यान, पावसामुळे गोठा, भिंती कोसळणे अशा घटनांमध्ये एकूण २४ मालमत्ताचे साडेपाच लाखांचे नुकसान झालेे. जिल्ह्यात राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसाने पान झोडपून काढले आहे.

करवीर, शिरोळ, हातकणंगले, कागल तालुक्यात मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात अधूनमधून सरी कोसळत होत्या. काही काळ सूर्यदर्शनही झाले. पावसामुळे उर्वरित पेरण्यांना गती आली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत साठ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांवर पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक भात, भुईमूग, सोयाबीनवर भर दिला जात आहे. सकाळी ७ ते ९ दरम्यान दोन तासांत पंचगंगेची पातळी एक फुटाने वाढली. ती, सकाळी २०.१ फूट होती. दुपारी चारच्या दरम्यान २१.३ फूट होती.

राधानगरी धरण क्षेत्रात अतिवृष्टी

सलग तिसऱ्या दिवशी राधानगरी धरणक्षेत्रसह पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत धरण क्षेत्रात ९२ तर दाजीपुरात ९५ मिलीमीटर पाऊस झाला. पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी ७०० क्युसेकचा विसर्ग कायम आहे. काळम्मावाडी धरण क्षेत्रात ६५ तर तुळशीत ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. २४ तासांत काळम्मावाडी धरणाच्या पाणीपातळीत दीड मीटरने वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज सकाळपासून दररोज धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे.

राशिवडे बुद्रुक - गेल्या आठ दिवसांत सुरू असलेल्या पावसाने परिसरात आज काहीशी विश्रांती घेतली. हळदी व राशिवडे येथील जुने बंधारे यंदा प्रथमच पाण्याखाली गेले आहेत.

धरण* क्षमता* आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

राधानगरी* ८.३६* ३.२७

तुळशी* ३.४७* ०.९३

वारणा* ३४.३९* १३.४३

दूधगंगा* २५.३९* ३.५४

कासारी* २.७७* ०.९०

कडवी* २.५१* ०.९८

कुंभी* २.७१* १.२४

पाटगाव* ३.७१* १.३५

चिकोत्रा* १.५२* ०.४४

चित्री* १.८८* ०.३९

जंगमहट्टी* १.२२* ०.३४

घटप्रभा* १.५६* १.५६

जांबरे* ०.८१* ०.४५

आंबेओहोळ* १.२४* ०.४०

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..