शरद पवार विरुद्ध अजित पवार, कोणाची बाजू योग्य? सर्व्हेतून धक्कादायक कल समोर

 


शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडाची पुनरावृत्ती झाली. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्यासोबत जवळपास ४० आमदार असल्याचं सांगण्यात येत. या बंडानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यापैकी कोणाची बाजू योग्य, असा प्रश्न 'सकाळ सर्व्हे'त विचारण्यात आला होता. यामध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर शिंदे गटाची स्क्रिप्ट पुन्हा समोर आली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अजित पवार ज्या पद्धतीने बंडासाठीची कारण देत आहेत, तशीच कारणे शिंदे गटाने देखील दिली होते. मात्र अजित पवार यांची प्रशासनावर असलेली पकड ही, अजित पवारांसाठी जमेची बाजु आहे. मात्र आपल्याच पक्षात बंड केल्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार यापैकी कोणाची बाजू, योग्य याबाबत झालेल्या सर्व्हेत जनता शरद पवारांच्या मागे उभी असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ सर्व्हेनुसार, ४३.६ टक्के लोकांनी शरद पवारांची बाजू योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर २३.१ टक्के लोकांनी अजित पवार यांची बाजु योग्य वाटते. तसेच ३३.३ टक्के लोकांनी सांगता येत नसल्याचं म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेस

दरम्यान या सर्व्हेमध्ये इतर पक्षांच्या मतदारांची मतेही घेण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीच्या ६१ टक्के मतदारांचा पाठिंबा शरद पवारांना आहे. तर २५ टक्के मतदारांना अजित पवारांची बाजू योग्य वाटते. १४ टक्के मतदारांनी सांगता येत नसल्याचं म्हटलं.

भाजप

भाजपच्या १९ टक्के मतदारांना शरद पवारांची बाजु योग्य वाटत असून ४१ टक्के मतदारांना अजित पवारांची बाजू योग्य वाटते. तर ४० टक्के मतदारांनी सांगता येत नसल्याचं म्हटलं.

काँग्रेस

काँग्रेसच्या ५७ टक्के मतदारांना शरद पवारांची बाजू योग्य म्हटलं असून १३ टक्के मतदार अजित पवारांच्या बाजूने आहे. तर ३० टक्के मतदारांनी सांगता येत नसल्याचं नमूद केलं.

शिवसेना

शिवसेनेच्या ५४ टक्के मतदारांनी देखील अजित पवारांना योग्य म्हटलं असून १५ टक्के लोकांनी अजित पवारांना योग्य ठरवलं आहे. त्याचवेळी ३१ टक्के काँग्रेस मतदारांनी सांगता येत नसल्याचं सांगितलं.

Comments

Popular posts from this blog

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

अजित पवारांचे बंड मोडून.. ? BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी काय असणार ?