पंकजा मुंडे काँग्रेस मध्ये जाणार..? राज्यात जोरदार चर्चा सुरु, अजून एक मोठा राजकीय भूकंप...!
मागील एक वर्षांपासून राज्यात राजकीय भूकंपाचे धक्के सुरु आहेत. अगोदर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे.आणि राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये फार मोठया प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. त्यांचे वातावरण अजून गरम आहे. राष्ट्रवादी मध्ये राष्ट्रीय अध्यक्ष कोण? तसेच खरी राष्ट्रवादी कोणाची? यावरून मोठा वाद आणि रस्सीखेच सुरु आहे. त्यातच अजून एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. ती म्हणजे पंकजा मुंडे काँग्रेस मध्ये जाणार अशा वावड्या मोठया प्रमाणात राज्यभर उडू लागल्या आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पक्ष प्रवेशाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पंकजा मुंडे या गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे सोशल मीडियावर दिसत होते. त्यामुळे आता या चर्चा जास्त जोर धरू लागल्या आहेत. शिवाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर तर सर्वांनाच माहित आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंकजा मुंडे सध्या भाजपा च्या महासचिव आहेत. आधीच नाराज असलेल्या पंकजा मुंडे आता काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत मात्र अजून त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका किंवा प्रतिक्रिया दिली नाही.येणाऱ्या काही दिवसात मात्र अजून एक मोठे राजकीय नाट्य घडणार हे नक्की.
Comments
Post a Comment