"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही"

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. पोहरादेवीच्या दर्शनाने ते महाराष्ट्र दौऱ्याची सुरूवात करत आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्णय त्यांनी नुकताच जाहीर केला होता. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाहीत, पण आता बाहेर फिरत आहेत त्यामुळे हा दौरा म्हणजे नौटंकी आहे, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. त्यावर शिवसेना उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बावनकुळे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. त्यावरून आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत  थेट ताकीद दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे नौटंकी असल्याचे सांगितले. त्यावर अरविंद सावंत यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी, "चंद्रशेखर बावनकुळे हे बावनकुळे नसून 'खुळे' आहेत" असे अरविंद सावंत म्हणाले होते. त्यावर भाजपा आमदार प्रसाद लाड अरविंद सावंतांवर बरसले. "काल-परवापर्यंत घरी बसलेले, झोपी गेलेले आता जागे झालेत आणि दौऱ्यावर निघाले आहेत. त्यात उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत साहेबांची झाली आहे. पण आमच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलावे ही माझी त्यांना नम्र विनंती आहे. बावनकुळे हे भाजपाचे महाराष्ट्रातील नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला. अरविंद सावंत साहेब, आता मी तुम्हाला साहेब म्हणतोय. पण तुम्ही जर पुन्हा अशी चूक केलीत तर तुमचा एकेरी उल्लेख करून तुमचे कपडे फाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही," असे सक्त ताकीदच आमदार प्रसाद लाड यांनी अरविंद सावंत यांना दिली.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..