समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका..! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू..

 

समरजीतसिंह घाटगेंनी जाहीर केली भूमिका..! मुश्रीफांविरोधात ठोकला शड्डू..

कागलचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळं कोल्हापुर ग्रामीणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुश्रीफांविरोधात भाजपकडून लढण्यास तयारी करुन बसलेले कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे नॉट रिचेबल झाले होते.

तसेच आपण कुटुंबियांशी चर्चा करुन लवकच निर्णय जाहीर करु असं म्हणत भाजपला इशारा दिला होता. यानंतर आज समरजितसिंह घाटगे यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपली भूमिका जाहीर केली.भाजपच्या कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे नाराज आहेत. कागलमधून आपण हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणुक लढवणार आणि जिंकणार अशी घोषणा घाटगे यांनी केली. कागलमध्ये त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्या सभेला शेकडो कार्यकर्ते हजर होते. दोनच दिवसांपूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावरुन आपण भाजपतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

 घाटगे म्हणाले, "मी येतानाच गुलाबी कुर्ता घालून आलो आहे. त्यामुळं मी आज इथं घोषित करतो की, आपल्या विजयाचं भूमिपुजन इथं झालेलं आहे. आमदारकी नुसती लढणारच नाही तर रेकॉर्ड मार्जिननं जिंकणार. राज्यात ज्या काही घडामोडी झाल्यात एकदम करेक्ट झाल्यात. आपण सर्वांनी एक शपथ घ्यायची आहे की, ऑक्टोबर २०२४ला रेकॉर्ड मार्जिननं कागलचा कोंढाणा परत घ्यायचा. उद्यापासून कागलच्या परिवर्तनासाठी कामाला लागा. परिवर्तन झालंय आता सर्वांनी मार्जिन ठरवा कागलचा कोंढाणा आपण घेऊ"

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..