फुटीर गट भेटून गेल्यानंतर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, पुरोगामी विचार...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटलेल्या गटाने आज शरद पवारांची वायबी सेंटरमध्ये भेट घेतली. त्यांनी पवारांनी विनवणी करुन एकत्र काम करण्याबाबत बातचित केली. त्यावेळी शरद पवारांनी मौन बाळगलं होतं. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात पवारांनी भूमिका स्पष्ट केली आहे.अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीमधून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल यांनी बाहेर आल्यानंतर सांगितलं की,
आम्ही शरद पवारांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना एकत्रित काम करण्याबाबत विनंती केली. मात्र शरद पवारांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं पटेलांनी स्पष्ट केलं.फुटीर गट वायबी सेंटरमधून गेल्यानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांची एक बैठक संपन्न झाली. जयंत पाटील म्हणाले की, गेलेल्या लोकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते जर माघारी आले तर पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला आनंदच होईल.
शरद पवार पुढे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी गेले. तिथे मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. पवार बोलतांना म्हणाले की, पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. मला भाजपसोबत जायचं नसून आपल्याला संघर्ष करायरचा आहे. असं म्हणून पवारांनी अजित पवार गटाचा प्रस्ताव फेटाळला. 'टीव्ही ९'ने यासंबंधीचे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
शरद पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
आज आमचे दैवत शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, सुनिल तटकरे यांच्यासह हे सर्व नेते वाय बी चव्हाण सेंटरला वेळ न मागता संधी साधून आलो. आम्ही शरद पवारांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद मागितले आणि त्यांना विनंती देखील केली. आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, तसेच राष्ट्रवादी पक्ष एकसंध कसा राहू शकतो, याबद्दल त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावे, असी विनंती देखील केली. यावर शरद पवारांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
Comments
Post a Comment