विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मोठा निर्णय घेणार, एकनाथ शिंदेंसह १६ जणांना; शिवसेनेच्या दोन्ही गटांना लवकरच नोटीस..
राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू असतानाच नार्वेकर यांनी आमदारांना नोटीस बजावल्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यातच १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत असून यासंदर्भात घोषणाही करण्यात आली आहे. त्यातच, राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ पाहायला मिळत असून राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेतल्याने शिंदे गट नाराज असल्याची चर्चाही सुरू आहे. त्यातच, आता विधानसभा अध्यक्षांनी नोटीस बजावल्यामुळे लवकरच आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे, अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार शक्य नसल्याचेही राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी आग्रही असल्याचे समजते, पण शिंदे गटाकडून अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास विरोध होत असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Comments
Post a Comment