नाशिकचा युवक पश्चिम बंगालमधून झाला खासदार! हजारो किलोमीटर दूर पित्यालाही अप्रुप

 


पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉग्रेस पक्षातर्फे साकेत गोखले यांना आज राज्यसभेवर निवडण्यात आले, आणि इकडे हजारो किलोमीटर दूर पंचवटीत राहणाऱ्या पित्याला खासदाराचा बाप झाल्याच्या अप्रुपाने उर भरुन आला.

सोबतच नाशिकचा आणखी एक खासदार झाल्याचा इतिहास झाला. खासदार साकेत यांचे वडील सुहास गोखले यांनी सकाळ जवळ भावना व्यक्त करतांना ‘‘ आयुष्यभर राजकारणापासून दूर राहिलो पण मुलगा मात्र खासदार झाल्याचे अप्रुप असल्याचे सांगितले.

या घटनेच्या निमित्ताने नाशिकचा युवक राज्यसभेत पश्चिम बंगालच्या कोट्यातून खासदार झाल्याचा इतिहास लिहिला गेला. साकेत गोखले यांची काही दिवसांपुर्वी राज्यसभेवर निवड झाली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉग्रेस पक्षाचे साकेत हे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. ठाण्यात माहीती आधिकार कार्यकर्ते म्हणून परिचित असलेल्या साकेत यांना तृणमुल कॉग्रेसने पक्षात काम करण्याची संधी दिली.

झोकून देउन काम केल्याच्या बदल्यात यंदा तृणमृल कॉग्रेसने त्यांच्या कोट्यातून साकेत गोखले यांना राज्यसभेवर पाठविले.साकेत यांच्या निवडीसोबत नाशिकला आणखी एक खासदार राज्यसभेत पोहोचल्याचा इतिहास झाला.

पंचवटीत मूळ

खासदार साकेत गोखले यांचे कुटुंब मूळ नाशिकचे आहे. पंचवटीत कपालेश्वर मंदीरामागे खांदवे सभागृहाजवळ त्यांचे घर आहे. त्याचे वडील सुहास गोखले हे तेथेच रहायला आहे. मूळ नाशिककर असलेल्या साकेत गोखल यांच्या आजी आणि आजोबा हे दोघेही नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स.रुंग्ठा विद्यालयात शिक्षक होते.तर वडील आणि काका नंदू गोखले हे दोघे पोलिस खात्यात आधिकारी होते. १९८४ च्या दंगलीत नंदू गोखले या पोलीस आधिकाऱ्यांची हत्या झाली.

भावाची हत्या झाली म्हणून सुहास गोखले यांनी खासगी कंपनी सोडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा देत पोलिस दलात आधिकारी बनले. पोलिस आधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे हे कुटुंब नाशिकहून मुंबई ठाण्यात स्थलांतरीत झाले.

सुहास गोखले यांचे पुत्र साकेत यांचे शिक्षण मुंबईत विल्सन कॉलेजला झाले. तेथेच माहीती आधिकार कार्यकर्ते म्हणून ते नावारुपाला आले. तर मुलगी अमेरिकेत डॉक्टरेक्ट करतात. मुलाने जे काही मिळविले ते पुर्णपणे त्याच्या स्वताच्या हिमतीवर मिळविले आहे.

मला त्याचे अप्रुप आहे. राजकारणापासून तर मी खूप अलिप्त राहिलो आहे. उभ्या आयुष्यात संबध ठेवला नाही. पण नेमक्या त्याच क्षेत्रात मुलगा खासदार झाल्याचे सुहास गोखले यांनाही अप्रुप आहे.

"आज सकाळी साकेत यांचा दूरध्वनी आला. बाबा मी खासदार झाल्याचे सांगितले. आयुष्यभर मी ज्या राजकारणापासून एकदम दूर आणि अलिप्त राहिलो त्याच क्षेत्रात मुलगा खासदार झाला आणि मी खासदाराचा बाप झाल्याचे अप्रुप वाटले. अधिवेशन असल्याने जावे लागेल मात्र त्याअगोदर नाशिकला येणार असल्याचे सांगितले." - सुहास गोखले (पंचवटी)

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..