राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा आणि शरद पवार पहिल्यांदाच येणार एकत्र ?

 अजितदादा पवारांनी ४० ते ५० आमदारांच्या पाठिंब्याने बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. यामुळे राज्यात राजकारणात खळबळ माजली असताना पवार काका-पुतण्यामध्ये संघर्ष सुरू झाला आहे. मुंबईत पार पडलेल्या दोन्ही गटाच्या मेळाव्यांमधून दोघांनी एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. मात्र या दोन नेत्यांमध्ये पक्ष कोणाचा यावरून लढाई सुरू असताना येत्या एक ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त अजितदादा - शरद पवार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. याबाबत जनतेला मोठी उत्सुकता लागली आहे. एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पुण्यात होणार आहे. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. यानिमित्त मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारहे नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे, पण शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादा आणि शरद पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येऊ शकतात.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..