"वंदे मातरम् बोलू शकत नाही कारण..." अबू आझमींच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक, फडणवीसांनी दिला सल्ला..
महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ झाला.अबू आझमी म्हणाले, आफताब पुनावला याने चुकीचे कृत्य केले. मात्र संपूर्ण देशात मुस्लीमांविरोधात नारे सुरू झाले. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात सकल हिंदू समाज मोर्चे निघाले. या मोर्चात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला.
२९ मार्चला संध्याकाळी ५ वाजता. तीन लोक औरंगाबादमध्ये राम मंदिराजवळ आले. मला यावेळी चुकीचे उत्तर दिले. यावेळी नारे दिले या देशात राहायचे असले. वंदे मातरम् म्हणावे लागेल. मात्र आम्ही वंदे मातरम् नाही म्हणून शकत कारण आम्ही अल्लाला मानतो. अल्लाशिवाय आम्ही कुणाच्या समोर डोक टेकवत नाही, असे अबू आझमी म्हणाले.
यावेळी भाजप आमदार आक्रमक झाले. इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, अशा घोषणा सभागृहात देण्यात आल्या.
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझी अबू आझमी यांना विनंती या देशात करोडो लोकांची वंदे मातरम् बाबत श्रद्धा आहे.त्यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. असा कोणता धर्म सांगेल की आपल्या आईला मान देऊ नका. हे धर्म गीत नाही. वंदे मातरम् हे आपले राष्ट्रगान आहे. तुमची भावना योग्य नाही.

Comments
Post a Comment