इर्शाळवाडी दरड दुर्घटनेचं बचावकार्य कायमचं थांबवलं; बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार

 


बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक घरं मलब्याखाली गेली होती. आज हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलेलं आहे.सर्च ऑपरेशन आजपासून थांबवण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

घटनास्थळावर सतत पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि धुक्यांमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. अशामध्ये आता ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली आहे. शोध कार्यामध्ये मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत. त्यामुळे शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेपत्ता दरडग्रस्तांना मृत घोषीत केले जाणार आहे.

इर्शाळवाडीत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. परंतु हे 57 जण बेपत्ता होते. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..