मोठी बातमी! अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला..


 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं. या दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने चर्चेला उधाण आलं आहे.अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यानतरं पहिल्यांदाच शरद पवार यांना भेटण्यासाठी अजित पवार यांच्यासोबतच अदिती तटकरे, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे नेते यशवंतराव चव्हाण सेंटरवर पोहचले असल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार यांचा आशीर्वाद मिळणार का?

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, या पार्श्वभूमिवर अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानावर बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार गटातील सर्व प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याचे पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीतील फुटीला १५ दिवसही उलटले नाही तोच महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा हालचालींना वेग आला आहे. अधिवेशनाच्या एक दिवस आधीच राष्ट्रवाचे सर्व मंत्री शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शरद पवार यांचा आशीर्वाद अजित पवार आणि मंत्र्यांना मिळणार का? हा प्रश्न देखील विचारला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..