दोन बड्या मशिदींना रेल्वे प्रशासनाची नोटीस; १५ दिवसांत हटवा, अन्यथा…

 


रेल्वेने दिल्लीतील दोन मोठ्या मशिदींना नोटीस बजवाली आहे. दिल्लीतील बंगाली मार्केट आणि आयटीओ येथील ताकिया बब्बर शाह या मशिदींना नोटीस पाठवण्यात आली आहे. रेल्वेकडून पाठवण्यात आलेल्या या नोटीसीमध्ये दोन्ही मशिदीच्या प्रशासनाला १५ दिवसात अतिक्रमण काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा अॅक्शन घेण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.रेल्वेने जारी केलेल्या नोटीशीमध्ये १५ दिवसांत अतिक्रमण काढा अन्यथा आम्ही येऊन काढू असे म्हटले आहे. तसेच या नोटीसीनंतर मशिद कमिटीने हे मशिद शेकडो वर्ष जुनी असल्याचा दावा केला आहे, तर रेल्वेने इमारत त्यांच्या जागेवर बनवल्याचे म्हटले आहे.

उत्तर रेल्वे प्रशासनाने नोटीस जारी केली असून त्यामध्ये रेल्वेची जमीनीवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आल आहे. तुम्ही अनाधिकृत रेल्वेच्या जमीनीवर बांधलेली इमारत/ मंदिर/ मशिद/मजार नोटीस दिल्याच्या १५ दिवसात स्वेच्छेने काढून टाकावी, अन्यथा रेल्वे प्रशासन अॅक्शन घेईल. रेल्वे अधिनियम अनुसार अनाधिकृत अतिक्रमण काढून टाकण्यात येईल. या प्रक्रियेत होणाऱ्या नुकसानीसाठी ते स्वतःच जबाबदार असतील, यासाठी रल्वे प्रशासन जबाबदार नसेल.

मशिद ताकिया बब्बर शाह चे सेक्रेटरी अब्दुल गफ्फार यांच्या नुसार ही मशिद तब्बल ४०० वर्ष जुनी आहे. या मशिदीच्या बाजूला बांधण्यात आलेल्या एमसीडीच्या मलेरिया ऑफिस देखील रेल्वे प्रशासनाने अशीच नोटीस दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..