सरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूचा तोबरा भराल तर सावधान! आला 'हा' नवा आदेश
:
तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन असलेल्या लोकांची आता चांगलीच पंचायत होणार आहे. कारण सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेत सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. जर कोणी तंबाखूचा तोबरा भरलेला आढळला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, राज्याच्या आरोग्य विभागानं हा नवा आदेश काढला असून त्यानुसार सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर या आदेशाचं उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याला २०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
तसेच या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करण्याचे आदेशही प्रत्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांतील कार्यालयांना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत, स्वस्थ भारत अभियानांतर्गत राज्यात ही मोहिम राबवण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment