अजित पवारांच्या एंन्ट्रीने..! शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटात प्रवेश करणार..
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याची निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरली आहे. राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचं कारण देत महाविकास आघाडी आणि शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची आता फार मोठी पंचाईत सरकारमध्ये होत असल्याची माहिती समोर येत आहे. यातच काल मुख्यमंत्र्यांसह शिंदे गटातील आमदार एकमेकांत भिडल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिंदे गटातील दहा आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता आहे. आता शिंदे गटात असलेलेा उद्रेक आणि तो थांबवताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होत असलेले त्रेटा तिरपट पहिल्यानंतर खुप दयनीय अवस्था त्यांची झाली आहे, त्यांच्यापैकी अनेक जणांनी आता पुन्हा मातोश्रीने साथ घातले तर आम्ही नक्कीच त्याला सकारात्मक देऊन अशा पद्धतीनेे वक्तव्य सुद्धा केली असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.दरम्यान, अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदे गटात मोठा गोंधळ होत आहे. यातच शिंदे गटातील आठ ते दहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे गटात गेलेले आमदार परत ठाकरे गटात परतणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Comments
Post a Comment