आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेबांना अन् मला राजकारण कळत नाही; नाशिकमध्ये आदित्य ठाकरे भावनिक

 


ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर घणाघात केला. ते म्हणाले की, सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला आहे. पुढे बोलतांना आदित्य म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन गेल्याने राज्याचं मोठं नुकसान झालं आहे. रोजगार गेला आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. दारं-खिडक्या उघड्या ठेवल्या असून तिथून सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्रामध्येच राहिले असते, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला.

''एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. राज्यातील खोके सरकार हे घोषणांचे सरकार आहे. घोषणा केल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटतं. राजकारणाची दलदल झाली आहे. कोण कोणाचे फोटो लावतो ते समजत नाही. आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? हेच कळत नाही. फोफाफोडीच राजकरण आम्हांला समजत नाही.'' असेही ते म्हणाले. 

या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल. आपल्याला प्रत्येक कोनाकोपऱ्यात फिरावं लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु आहे. बोललं तरी गुन्हे दाखल होत आहेत. असं शेवटी आदित्य ठाकरे म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..