"भाजपमध्ये जास्त त्रास झाल्यास साडी चोळी घेऊन तिला घ्यायला जाईल" पंकजा मुंडेंसाठी भाऊ आला धावून

  


भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सतत होत असते. महाराष्ट्र भाजपकडून पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय अन्याय होत असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत असतात. यापूर्वी त्यांच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे नाराज असल्याचे त्यांनी म्हटले होते. आपल्यात क्षमता आहे का, याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या होत्या. यानंतर त्यांनी राजकीय जिवनातून दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता.

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर त्यांचे मानलेले भाऊ महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांना दिल्या घरी सुखी राहा, असे महादेव जानकर म्हणाले आहेत. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये जास्त त्रास होईल तेव्हा साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल, असं जानकर म्हणाले. अहमदनगर दौऱ्यावर असताना जानकर बोलत होते.

जानकर म्हणाले, पंकजा भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्या माझ्या बहिण आहेत. त्या राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून काय ती जबाबदारी मी देईल. मात्र सध्या दिल्या घरी सुखी राहा एवढेच मी पंकजा मुंडे यांना सांगले. ज्यावेळी तिला भाजपमध्ये जास्त त्रास होईल ते तेव्हा मी माझ्या बहिणीला साडी चोळी घेऊन घ्यायला जाईल.

महादेव जानकर यांनी भाजपवर देखील टीका केली. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो. मात्र आताचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना वाटत असेल आमची गरज नाही. त्यामुळे त्यांच्या मागे लागण्यात अर्थ नाही, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..