'या' कारणांमुळे अजित पवारांनी बंड करत शिंदे - फडणवीसांची हातमिळवणी केली !
'या' कारणांमुळे अजित पवारांनी बंड करत शिंदे - फडणवीसांची हातमिळवणी केली !
राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अर्थमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. आज चार वाजता अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यत आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांनी आमदार आणि जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता अजित पवार हे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. छगन भुजबळांसह राष्ट्रवादीचे चार वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून अद्यापही अजित पवार यांच्या मनधरीणेच प्रयत्न सुरू आहेत. सुप्रिया सुळे या अजित पवार यांची समजून घालण्यासाठी देवगिरीवर गेल्या होत्या पण अजित पवार हे ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पदात रस नसल्याचं म्हटलं होतं. मला संघटनात्मक जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवं असल्याची चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सहा जून रोजी आपल्या सर्व प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र त्यापूर्वीच अजित पवार यांनी आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. ते आज चार वाजता अर्थमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Comments
Post a Comment