मुख्यमंत्र्यांच्या सर्व नियोजित बैठका ढकलल्या पुढे; आजच होणार शपथविधी
राष्ट्रवादी सरकार समावेशानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. पण हा विस्तार आजच होऊन शपथविधी देखील पार पडेल अशी माहिती साम टिव्हीच्या सुत्रांनी दिली आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरु होत्या. खाते वाटप त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार याबाबत सखोल चर्चा सुरु होती. मात्र, याला पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. कारण आजच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यानंतर लवकरच खाते वाटपही केलं जाणार आहे.
काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली होती. त्यानंतर आज मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले आहेत. आजच राजभवनावर शपथविधी होणार आहे. त्याअनुषंगानं राजभवनावर हालचालींना वेग आलेला आहे. त्याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. आजच्या शपथविधीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांचाच समावेश असणार आहे. त्यानंतर खातेवाटपही जाहीर होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदारांचा अचानक सत्तेत शिरकाण आणि मंत्रिपदाची शपथ यामुळं शिवसेना आणि भाजपमधील आमदार जे मंत्रीपदासाठी इच्छुक होते, त्यांच्यामध्ये नाराजी होती. पण आता हा तिढा सोडवण्यात यश आलं आहे. यामध्ये अजित पवारांना अर्थ खातच मिळण्याची दाट चर्चा आहे.
Comments
Post a Comment