अजित पवारांना फोडून भाजपला काय मिळालं? ५ महत्वाची कारणं..
एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजित पवारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झालाय. दादा आपल्या सोबत ४० आमदार आणि काही खासदारही घेवुन गेले. आता राष्ट्रवादीच्या ५२ पैकी ४० आमदार दादांसोबत असल्याने शरद पवारांची मोठी अडचण निर्णाण झाली आहे.महत्वाच म्हणजे शरद पवारांचे कट्टर आणि जेष्ठ नेते सुद्धा अजितदादांसोबत आहेत, त्यामुळे एकूणचं पक्षाच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यात मविआ पुर्णपणे विखुरली गेली आहे. पण अजित पवारांच्या या बंडाचा फायदा भाजपला कसा झाला जाणून घेवू या
१) एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी सत्ता कायम
एका वर्षापूर्वी एकनाथ शिदें यांनी शिवसेनेविरूद्ध बंड पुकारलं ४० आमदारांना त्यांनी सोबत घेऊन सरकार स्थापन झालं. पण यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं या आमदारांनविरूद्ध अपात्रतेची कारवाई केली. शिवसेनेतला हा वाद कोर्टात सुद्धा पोहोचला होता.
सुप्रीम कोर्टाने यावर आपलं म्हणणं मांडल. आणि आता अंतिम निकाल विधानसभा अध्यक्षांकडे आहे. एकनाथ शिंदे आणि आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. आता हे आमदार अपात्र ठरले तर सरकार कोसळेल.
यासाछी सेफ भूमिका घेणं भाजपला भाग आहे, त्यामुळे भाजपने अजित पवाारांना सोबत घेतलं. जेणेकरून जरी उद्या शिंदे आणि आमदार अपात्र ठरले तरी सत्तेवर भाजपचा पगडा कायम राहिलं.
२) लोकसभेसाठी भाजप अलर्ट मोडवर
सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहतायेत. अशात नुकताच महाराष्ट्राच्या शेजारीच असणाऱ्या कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव झाला. तेव्हापासुन भाजप अर्लट मोडवर आहे. त्यात देशभरातल्या विरोधकांनी भाजपविरोधी मुठ आवळली आहे.
बिहारचं सांगायचे झालं तर, आधी भाजपसोबत असणऱ्या नितीश कुमारांनी डाव पलटला. आणि लालुप्रसाद यादव आणि काँग्रेससोबत मिळून सरकार स्थापन केलं. इकडे पश्चिम बंगालमध्येही तशीच काहीशी परिस्थिती आहे.
आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाविरोधी वातावरण आहे. त्यामुळे सत्ता आहे त्या राज्यांमध्ये टिकून राहण्यासाठी भाजपला स्ट्राँग मित्र हवा होता. जो राष्ट्रवादी काँग्रेसचं असु शकतो.
३) दोनचे चार पक्ष फायदा मात्र भाजपला
देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीमळे आधी शिवसेना फोडण्यात भाजपला यश आलं. शिवसेनेचे दोन गट पडले एक एकनाथ शिंदे आणि दूसरा ठाकरे गट. त्यामुळे शिवसैनिकांचे विभाजन झाले. असाच प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाल.
आता अजित पवार आणि शरद पवार असे २ गट पडलेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही कोणता झेंडा घेवू हाती म्हणत गल्लत झाली आहे. या दोन्ही पक्षाचे ४ तुकडे झालेत.
नेते विभागले, कार्यकर्ते विभागले, आणि मतदारही. पण याचा फायदा भाजपसला पुरेपुर घेता येणार आहे. कारण भाजप एक पूर्ण पक्ष म्हणून राज्यात अस्तित्वात आहे. म्हणून या पक्षफुटीचा भाजपला फायदा होईल
४) मराठा नेता.
राज्याच्या राजकारणात जातीय राजकारण देखील मुद्दा बनत चाललाय. त्यात भाजपमध्ये फडणवीसांमुळे ओबीसी नेता आहे. त्यात वंजारी नेते आहेत. आठवलेंसारखा दलित चेहराही सोबत आहे. पण भाजपमध्ये तगडा असा मराठा नेता नव्हता. आणि अजित पवारांसारखा चर्चित मराठा नेता सोबत असल्याने भाजपला सुद्धआ खेळी सोपी जाणार आहे
५) सहकाराचे राजकारण
सहकारी साखर सारखाना, बाजार समित्या, जिल्हा परिषद, दूध संघ याव राष्ट्रवादीची चांगली पकड आहे. आणि अजितदादा यांत चांगलेच मुरलेत . आता भाजप विधानसभा आणि लोकसभेत निवडणूकीत मागे आहेत. त्यामुळे सहकारी सहकार कारख्यांयच्या राजकारणात उचरण्यासाठी भाजपा अजितदादांचे बोट ठरू शकातात.
ही आणि अशी अनेक कारण आहेत ज्यामुळे अजित पवारांच्या बंडाचा फायदा भाजपला होणार आहे.
Comments
Post a Comment