अजितदादांनी फडकवला राष्ट्रवादीचा झेंडा ; बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांची संख्या आली समोर.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थक आमदारांची वेगवेगळी बैठक बोलविण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार पेचात सापडले आहेत. धरले तर चावते, सोडले तर पळते अशी राजकीय परिस्थिती राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांसमोर उभी ठाकली आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांची आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थक आमदारांची वेगवेगळी बैठक बोलविण्यात आली आहे. यामुळे दोन्ही गट शक्तीप्रदर्शन करत आहेत. अशातच दोघांच्या बैठकांना किती आणि कोणते आमदार उपस्थित राहतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.अजित पवारांच्या बैठक स्थळी जवळपास २८ आमदार पोहचले आहेत, तर शरद पवारांच्या बैठकस्थळी ८ आमदार पोहोचले आहेत. धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन आले आहेत. तर छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी अजित पवारांच्या बैठकीला ४३ आमदार आले आहेत, काही आमदार वाहतूक कोंडीत अडकले असल्याचे ते म्हणाले.यामुळे अजित पवार यांच्या बाजुने संख्याबळ अधिक आहे. प्राजक्त तनपुरे हे अजित पवारांसोबत होते, परंतू ते शरद पवारांच्या बैठकीला पोहोचले आहेत. नरहरी झिरवळांसह अजित पवारांचे मंत्री आदी आमदार अजित पवारांच्या बैठकीला पोहोचले आहेत.५३ आमदारांपैकी २८ आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. शरद पवार यांना १२ आमदारांचा पाठिंबा असल्याचं समोर आलं आहे. तर १३ आमदार हे  अजूनही तटस्थ भूमिकेत असल्याचं पहायला मिळत आहेत.


Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..