फडणवीस म्हणजे नागपूरला कलंक आहे, असं म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

 


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नागपुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरला लागलेला कलंक आहेत, असे म्हणाले होते. त्याला तास उलटत नाही तोच फडणवीसांनी आठ मुद्द्यांमध्ये कलंक कशाला म्हणतात याचे ट्विट करून जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी भलेमोठे ट्विट करत उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असेलतर उपचार करून घेण्याचा सल्ला दिला आहे. स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या, असे फडणवीस म्हणाले आहेत. पहा फडणवीस काय म्हणाले... ट्विट जसेच्या तसे...

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 

2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!

 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!

 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 

5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 

6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 

7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 

8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..