एक मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्री आज एकाच जाहीर कार्यक्रमात; गडचिरोली येथे सभा..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पहिल्यांचा एकत्र जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर दोन्ही गटांकडून आमचाच खरा पक्ष, असं सांगितलं जात आहे. पक्षामध्ये सध्या तू-तू, मैं-मैं सुरु झालेलं आहे. त्यातच शरद पवार आज येवल्यात जाहीर सभा घेणार आहेत. काल रात्री रोहित पवार यांनी कार्यक्रमस्थळाची पाहाणी केली.दरम्यान, आजच्या गडचिरोलीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार काय बोलणार; याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. कोटगुल एमआयडीसीच्या मैदानावर ही सभा होत आहे. नवीन सत्ता समीकरणानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकत्र व्यासपीठावर येणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झालेला असला तरी सध्या खातेवाटप झालेलं नाही. अधिवेशनाच्या अगोदर खातेवाटप होईल, असं सांगितलं जात आहे.
Comments
Post a Comment