एनडीएच्या बैठीकत शिंदे-पवारांना मानाचं स्थान; पंतप्रधानांच्या रांगेत आसन व्यवस्था..

 

बंगळूरुमध्ये विरोधकांची दोन दिवसीय बैठक संपन्न झाली आहे. दुसरीकडे दिल्लीत एनडीएची बैठक संपन्न झाली. एनडीएच्या बैठकीला महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांना मोदींच्या रांगेत मानाचं स्थान देण्यात आलं.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काल बोलतांना सांगितलं होतं की, एनडीएमध्ये ३८ पक्षांचा सहभाग आहे. विरोधी गटाकडे ना नीती आहे ना नेता.. त्यामुळे घराणेशाही जपण्यासाठी त्यांचं संघटन सुरु आहे. दुसरीकडे आम्ही देशहितासाठी एकत्र येत असल्याचं नड्डांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, 'एनडीए'च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बाजूला अजित पवार बसलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांगेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था असल्याने भाजपला हे नेते किती महत्त्वाचे वाटत आहेत, हे दिसून येतंय.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..