राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे व्हीप जारी, नेते जोमात कार्यकर्ते कोमात..

 उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने बैठक बोलावली आहे. दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कुणाच्या बैठकीत जावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांनी देखील हीप जारी केला राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या उद्या बैठका आहेत. शरद पवार यांच्या गटाची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक होणार आहे तर अजित पवार यांच्याकडून एमएडीला बैठक बोलावली आहे. उद्या दोन्ही गटाच्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी देखील उद्याचा दिवस महत्त्वाचा मानल्या जात आहे. विधान परिषदेचे एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत पाच आमदार तर शरद पवारांसोबत चार आमदार आहेत. रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी,  विक्रम काळे,सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत तर एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड, बाबा जानी दुरानी हे शरद पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहे.महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे.प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे  पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

अजित पवारांचे बंड मोडून.. ? BJP ला शह देण्यासाठी शरद पवारांची नवी खेळी काय असणार ?