पेट्रोल होणार १५ रुपये प्रति लिटर, प्रतापगडमध्ये नितीन गडकरींची मोठी घोषणा..
पेट्रोल होणार १५ रुपये प्रति लिटर, प्रतापगडमध्ये नितीन गडकरींची मोठी घोषणा..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उदयपुरमधील प्रतापगड येथे पेट्रोलच्या किंमतीबद्दल मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की पेट्रोल आता १५ रुपये प्रति लिट
र होऊ शकते. केंद्रीय मंत्री म्हणाले की शेतकरी आता अन्नदाता नाही तर, ऊर्जादाता बनेल.
प्रतापगड येथे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, " हा आमच्या सरकारचा विचार आहे. मी ऑगस्टमध्ये टोयोटा कंपनीच्या गाड्या लॉंच करणार आहे. आता सर्व गाड्या शेतकऱ्यांनी बनवलेल्या इथेनॉलवर चालतील."
गडकरी म्हणाले की ६० टक्के इथेनॉल आणि ४० टक्के वीज, दोन्हींची सरासरी जर पकडली तर पेट्रोलचा दर १५ रुपये प्रति लिटर होऊ शकतो. यामुळे जनतेचं भलं होईल. आयात कमी होईल. प्रदुषण कमी होईल आणि शेतकरी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनेल. विमानचं इंधनही शेतकरी बनवतोय. ही आमच्या सरकारची कमाल आहे.
कॉंग्रेसवर टीका
गडकरी म्हणाले की १६ लाख कोटींचा इंधन आयातीवर होणारा खर्च आता शेतकऱ्याच्या घरात जाणार. पानिपतपासून परळीपर्यंत इथेनॉल तयार होत आहे. राजस्थानमधील प्रतापगड येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "कॉंग्रेसने एवढे वर्ष देशात शासन केले गरिबी नष्ट करण्याचे आश्वासन देऊन गरिबी दूर केली नाही. मात्र, एक गोष्ट नक्की झालीये की कॉंग्रेसने आपल्या लोकांची गरिबी दूर करुन टाकली."
१० कोटी तरुणांना मिळणार रोजगार:
रोजगारावर बोलताना गडकरी म्हणाले की ,"आपल्या ऑटोमोबाइल क्षेत्राचा टर्नओवर ७.५ लाख कोटी इतका आहे. सरकारला सर्वात जास्त जीएसटी देणारे हे क्षेत्र आहे. साडे चार कोटी तरुणांना नोकरी मिळाली आहे. आम्ही ठरवलयं की या क्षेत्राला १५ लाख कोटींचे बनवू. ज्याने १० कोटी तरुणांना नोकरी मिळेल."
Comments
Post a Comment