खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली - अजित पवार
खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहचली असून राज्यपालांच्या सहीनंतर खातेवाटप जाहीर करण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार नाराज असल्याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे अजित पवार म्हणाले.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक प्रभाकर काळे राजभवनावर पोहचले आहेत. ते खाते वाटपाची यादी घेऊन आल्याची शक्यता आहे. खाते वाटपाची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून राज्यपालांच्या मंजुरी नंतर खाते वाटप जाहिर केले जाईल.
Comments
Post a Comment