'भाजपसोबत जाऊ शकत नाही'; शरद पवारांनी आमदारांसमोर स्पष्ट केली राजकीय भूमिका
अजित पवारांनी शिंदे सरकार पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांचे अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले आहेत. यातील अजित पवार गटाने पक्ष एकसंघ राहावा, यादिशेने विचारा करावा, अशी विनंती शरद पवारांना केली. यानंतर शरद पवारांनी 'भाजपसोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागले, अशी भूमिका त्यांच्या समर्थक आमदारांसमोर स्पष्ट केली.
अजित पवार गटाचे आमदार आणि नेत्यांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. आजही उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनीही भेट घेतली.राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड करायलाही सुरुवात केली आहे. नाशिकमध्येही शरद पवार विरुद्ध छगन भुजबळ असा सामना पाहायला मिळाला.
आता गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गट हा शरद पवारांची भेट घेताना दिसत आहे. अजित पवार गटाने आजही पक्ष एकसंघ राहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा अशी गळ घातली. मात्र, अजित पवार गटाच्या विनंतीनंतर शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या भेटीनंतर त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतली. त्यांच्या समर्थक आमदारांशी बोलताना शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. 'भाजपसोबत जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावं लागेल. शरद पवार यांनी त्यांचे समर्थक आमदार यांच्याशी बोलताना भूमिका केली स्पष्ट केली.दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार भेटून गेल्यावर शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक आमदारही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले. त्यानंतर त्यांची बैठक सुरू झाली आहे.
Comments
Post a Comment