आताच्या घडीची मोठी बातमी, पुतण्याची काकावर मात गेम ओव्हर ..
राष्ट्रवादी काँग्रेसचे आज मुंबईत दोन मेळावे होणार आहेत. अजित पवार यांच्या गटाचा मेळावा बॅण्ड्रा एमआयटी येथे होणार आहे तर शरद पवार गटाचा मेळाला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांआधी एक महत्वाची बातमी आहे. अजित पवार यांच्याकडे तब्बल 44 आमदारांच समर्थन असल्याची महत्वाची माहिती आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेच्या 42 आणि विधान परिषेदच्या 2 आमदारांच समर्थन आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत एकूण 54 आमदार आहेत. याचा अर्थ शरद पवार यांच्या गटाकडे फक्त 12 आमदारांच समर्थन उरलं आहे. अजित पवारांची मोठी खेळी? महत्वाच म्हणजे अजित पवार यांनी फक्त पत्रावर आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेतलेल्या नाहीत. त्यांनी आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेतलं आहे. त्यामुळे अजित पवार गटाने नेमलेले प्रतोद अनिल पाटील यांचा व्हीप या आमदारांना लागू होतो. हा व्हीप मोडल्यास आमदारांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.
Comments
Post a Comment