भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

 





संजय राऊत यांनी "भाजपाने आधी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक इतिहास घडवत नाहीत ते दुसऱ्यांचे इतिहास नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतात. पण कितीही प्रयत्न केला तरी त्यांनी तसे करता येणार नाही. बाळासाहेबांचा, शरद पवारांचा इतिहास पुसला जाणार नाही" असा स्पष्ट इशारा भाजपाला दिला. यानंतर भाजपाने आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

"जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "विश्वविख्यात प्रवक्ते, शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की हा दिल्लीचा डाव?" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे."...या प्रस्तुत प्रसंगी "जाणता राजा" हरला नाही, तर तो जिंकला... हे सांगण्यासाठी दरबारी राजकारणात "भाट" ठेवलेले असतातच... वेगवेगळ्या "माध्यमातून" भाट आपलं काम चोख करीत आहेत. विश्वविख्यात प्रवक्ते आणि शापित दरबारी प्रभादेवीच्या गल्लीत बसून सांगतात की, हा तर दिल्लीचा डाव..? आमचं पुन्हा पुन्हा एकच म्हणणं जर विश्वविख्यातांनी काढला, नसता आमचा बाप तर झाला नसता तुमच्या मालकांना हा एवढा ताप!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..