''त्यांना यातलं काहीच कळत नव्हतं...'', शरद पवारांच्या पुस्तकाचा दाखला देऊन फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला
फडणवीस पुढे म्हणाले, आता जे निर्णय होतील ते सगळे निर्णय सामान्य माणसांच्या हिताचे होतील. शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये विमा देण्याचा निर्णय आपण घेतला, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. शेतकरी सन्मान निधाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळतात. हा नाशिक जिल्हा आहे, कुंभमेळ्याचा जिल्हा आहे. शासन आपल्या दारी हा शासकीय योजनांचा कुंभमेळाच आहे. आपली सेवा करण्याची संधी मिळाली त्यामुळे आनंद आहे.विरोधकांबद्दल बोलतांना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, चांगलं काम केलं, लाभ दिला तरी पोटात दुखतं. परंतु लोकांना लाभ मिळतो म्हणून लोकं येतात, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु कुणाच्याही पोटात दुखलं तरी डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत. त्यांच्या पचनी पडलं नाही तर अजितदादा सोबत आहेतच. अजितदादा मागच्या कार्यक्रमात म्हणाले होते की, दोनच झेंडे आहेत. मात्र आज
तिनही पक्षांचे झेंडे याठिकाणी आहेत.
Comments
Post a Comment