'अजित पवारांना व्हिलन केलं जातंय अन् भाजप मजा बघतंय'; रोहित पवारांची टीका
रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, काल नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी बोलताना सहज अजित पवारांना बाजूला काढलं. पक्ष फुटल्याचं खापर त्यांनी अजितदादांवर फोडलं. दुसरीकडे नाशिकमध्ये पोस्टरवर अजित पवारांचा फोटो सुद्धा नव्हता. अजित पवारांना चार-पाच लोकं व्हिलन करत आहेत. दादा मोठे नेते आहेत तो निर्णय कोणालाच पटला नाही. ते (भाजप) एसीमध्ये बसून मजा बघतायत आणि आम्ही आमच्यात भांडतोय. लोकांना माहिती आहे की, कुटुंब- पक्ष कोणी फोडला. लोकं या गोष्टी विसरणार नाहीत असेही आमदार रोहित पवार म्हणाले.अजित पवारांसोबत गेलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वतःला बाजूला करत आहेत. निर्णय घेताना हा विकासासाठी निर्णय घेतला असं सांगतात मग पदं असताना तुम्ही विकास केला नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे ही लढाई भूमिका, अस्मिता, स्वाभिमान आणि एका विचाराची आहे असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.
Comments
Post a Comment