पक्ष, चिन्ह आमच्याबरोबर, मग नोटीस काढण्याचा अधिकार कोणाला? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले..

 



राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाचे रुपांतर आता कायदेशीर लढाईत होणार आहे. शरद पवार यांनी पक्षातून प्रफुल्ल पटेल अन् सुनील तटकरे यांना बडतर्फे केले. त्याचवेळी नऊ जणांचा नोटीस देण्यासंदर्भात अजित पवार यांनी भूमिका मांडली.

 राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढणार असल्याचे चित्र आज दिसून आले. एकीकडे शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना बडतर्फे केले तर दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांनी नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्याचवेळी अजित पवार यांनी नऊ जणांना पाठवलेल्या नोटीससंदर्भात भूमिका मांडली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ही लढाई कायद्याची लढाई होणार आहे.

काय म्हणाले अजित पवार

अजित पवार यांनी सांगितले की, पक्ष आणि पक्षचिन्ह आमच्यासोबत आहे. त्यामुळे नोटीस काढण्याचा अधिकार कोणाला नाही. आमच्या नऊ जणांना ते नोटीस काढू शकत नाही. आताच प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सर्वच अधिकार असणार आहे. नोटीस काढण्याचा प्रकार म्हणजे आमच्या आमदारांना घाबरवण्याचा प्रकार आहे. परंतु सर्वच आमदार आमच्यासोबत आहे, असा दावा अजित पवार यांनी केला.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नवीन नियुक्ती प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची त्यांनी नियुक्ती केली आहे. राज्यातील नियुक्ता करण्याचे अधिकार सुनील तटकरे यांना असणार आहे. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेली नियुक्ती रद्द करत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून आपण हा निर्णय घेतला असल्याचा त्यांनी सांगितले. अजित पवार विधिमंडळाचे नेते म्हणून निवड जाहीर केली आहे.

शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांच्या इच्छेचा आदर करावा, अन् त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी सुरज चव्हाण तर महिला प्रदेशाध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..