खातेवाटपाचं ठरलं! भाजप-शिवसेनेकडील कोणकोणती महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे? यादीच आली समोर...
खातेवाटपावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सतत बैठका होत आहे. अशातच खातेवाटपासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल १३ दिवसानंतर युती सरकारचा खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असून यामध्ये अजित पवार यांच्या गटाची सरशी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
शिंदे गटाकडील ४ खाती आणि भाजपकडील ५ खाती अजित पवार यांच्या गटाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे अर्थ आणि सहकार खातं हे राष्ट्रवादीला देण्यात आल्याचं बैठकीत ठरलं आहे.
यामध्ये महसूल आणि ग्रामविकास खात्याचा समावेश नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून युती सरकारमधील खातेवाटपावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू होती. मात्र, खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
कोणकोणती खाती राष्ट्रवादीकडे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडील परिवहन, कृषी, सामाजिक न्याय आणि अल्पसंख्ख्याक खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर भाजपकडील अर्थ, सहकार, महिला व बाल कल्याण, अन्न व नागरी पुरवठा आणि क्रीडा व युवक कल्याण ही खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
ब्रेकिंग
अजित पवार गटाला मिळणारी खाती
अर्थ - अजित पवार
कृषी- छगन भुजबळ
सहकार- दिलीप वळसे पाटील
परिवहन- धर्मराव अत्राम
सामाजिक न्याय - धनंजय मुंडे
अन्न नागरी पुरवठा - अनिल भाईदास पाटील
महिला बाल कल्याण - अदिती तटकरे
क्रीडा - संजय बनसोडे
अल्पसंख्यांक - हसन मुश्रीफ
Comments
Post a Comment