मी अजित अनंतराव पवार... ५ वर्षांच्या सरकारच्या काळात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
राज्याच्या राजकराणासाठी आजचा दिवस कधीही न विसरण्यासारखा आहे. पहाटेचा शपथविधी अयशस्वी झाल्यानंतर आज अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज सकाळपासूनच राजकियी हालचालींचा वेग आलेला होता. आधी अजित पवारांनी त्यांच्या समर्थकांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते समर्थक आमदारांसह राजभवनात पोहोचले. अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील राजभवनात दाखल झाले होते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जातीये.
Comments
Post a Comment