पंकजा मुंडे यांना अजित पवार यांच्या बंडाचा फटका?, परळी मतदारसंघ हातातून जाणार?; बीडमधील राजकीय समीकरण.

  





पंकजा मुंडे यांना अजित पवार यांच्या बंडाचा फटका?

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. अजित पवार यांच्यासोबत नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी भाजपसोबत मिळून आगामी निवडणुका लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. तसं झाल्यास भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजितदादा यांच्या बंडाचा सर्वाधिक फटका पंकजा मुंडे यांना बसणार असल्याचं सांगितलं जात आहे.अजित पवार हे आता भाजप आणि शिंदे गटासोबत गेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका ते या दोन्ही पक्षासोबत मिळून लढण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पंकजा मुंडे यांची अडचण होऊ शकते. कारण धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यांनी मंत्रिपदाची शपथही घेतली आहे. उद्या विधानसभा निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र लढल्यास बीड जिल्ह्यातील परळी विधानसभेची जागा धनंजय मुंडे यांनाच सोडली जाऊ शकते. त्यामुळे पंकजा मुंडे यांची अडचण होऊ शकते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी परळीतून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी आगामी निवडणूक परळीतूनच लढणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता बदलत्या समीकरणामुळे त्या परळीतून विस्थापित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..