"घ्या जगदंबेची शपथ! बाळासाहेब ठाकरेंचे सुत आहात तर सांगाच तुमचे 'सुत' कोणाशी जुळले होते?"
"जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात?"
"उद्धवजी, केंद्र सरकारच्या लोकाहिताच्या योजनांना फसव्या, बोगस म्हणून तुम्ही बांधावर, टपरीवर चर्चा करणार असाल तर, होऊ द्या चर्चा!! पण, सद्या एकच चर्चा आहे. ती म्हणजे, तुम्ही जागोजागी देवाधिकांच्या "शपथा" का घेताहात? मग, असेल हिंमत तर एकदा शपथेवर सांगाच. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसजींचे फोन तुम्ही का घेतले नाहीत? घ्या, जगदंबेची शपथ !! वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे "सुत " आहात, तर आता सांगाच तुमचे "सुत" कोणाशी जुळले होते? घ्या शपथ आणि कळू द्या तुमची वचनबद्धता.!! उद्धव ठाकरेजी, चर्चा तर होणारच!" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
"खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं" उद्धव ठाकरे यांच्या टीकेला याआधी देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "खोटं बोल पण रेटून बोल हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. "गद्दारी करून मिळवलेली सत्ता तुम्हाला टिकवता आली नाही. आणि आता खोट्या शपथा घेऊन थापा मारत आहात" अशा शब्दांत निशाणा साधला. यासोबतच "शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं असे तुम्ही सांगायचे. पण हे पद तुम्ही स्वतःच बळकावले" असंही म्हटलं आहे.
Comments
Post a Comment