सेटलमेंट करून आंदोलन, कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर शिवसैनिकांचे गंभीर आरोप..
कोल्हापुरातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांवर शिवसैनिकांचे गंभीर आरोप..
शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी तक्रार केली आहे. देवणे हे सेटलमेंट करून आंदोलन करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ठाकरे शिवसेनेत फुटीचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी आणि भुदरगड येथील ठाकरे गटाचे शिवसैनिक दोन दिवसापूर्वी मुंबई सेवा भवन येथे गेले होते. यावेळी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष देवणे यांच्या कार्यक्षमतेवर कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित केला. शिवसेनेच्या वरिष्ठांकडे याबाबत तक्रारी मांडल्या. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांच्या या तक्रारीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेत जिल्हाध्यक्षांबाबत कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे. वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केल्यास जिल्ह्यातील ठाकरे गटात फूट पडण्याची दाट शक्यता आहे.
Comments
Post a Comment