"माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला"; भुजबळांवर निशाणा साधत पवारांनी मागितली येवलेकरांची माफी

 राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात घेतली. या सभेत त्यांनी भुजबळांवर सडकून टीका केली. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला याची मी माफी मागतो अशा शब्दांत त्यांनी येवलेकरांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला.पवार म्हणाले, महाराष्ट्रात या जिल्ह्यानं अनेक वर्षे पुरोगामी विचारांना साथ दिली. या नाशिकमधील शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, दुष्काळी भागातील शेतकरी असेल त्यांनी कधी सत्याची साथ सोडली नाही. इथल्या लोकांना आम्ही दिल्लीत जाण्याची संधी दिली. भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आम्हाला आवश्यकता होती, त्यामुळं आम्ही येवल्याची निवड केली. मी दिलेली नावं कधी चुकली नाहीत पण एका नावानं घोटाळा झाला. माझा अंदाज कधी चुकत नाही पण इथं माझा अंदाज चुकला. माझ्या निर्णयावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यामुळं त्यामुळं जर त्रास झाला असेल तर मी तुमची माफी मागितली पाहिजे. त्यामुळेच मी इथं आलो आहे.

वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल...

अजित पवार  यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या वयावरुन चांगलाच वाद रंगला होता. अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत टीका केली होती. त्याचाही शरद पवार यांनी समाचार घेतला. काहीही बोला पण वयाचा उल्लेख महागात पडेल.." असा थेट इशारा त्यांनी टीका करणाऱ्यांना दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल...

यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या पक्षावर, सहकाऱ्यांवर अनेक आरोप केले. जर असे काही असेल तर तुमची सगळी ताकद वापरा आणि आणि चौकशी करा. त्यासाठी आमचा सर्वांचा पाठिंबा राहिल; आणि दोषींना कडक शिक्षा करा.." अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..