मोठी बातमी..! उबाठा गट आणि सुळे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार..!
उबाठा आणि सुळे गटाने राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असा प्रस्ताव केल्याची माहिती आहे. याबद्दल मातोश्रीवर देखील चर्चा झाली. जेणेकरुन हे दोन्ही गट काँग्रेसमध्ये विलीन करुन एकाच पक्षाच्या नावाखाली लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवण्याची चर्चा सुरु आहे, अशी माहिती असल्याचा खुलासा आमदार नितेश राणेंनी केला आहे. दि. ६ जुलै रोजी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. नितेश राणे म्हणाले, "पाटन्यामध्ये जी बैठक झाली, अशा काही गोष्टींच्या माध्यमातून संजय राऊत महाराष्ट्रासमोर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असं चित्र निर्माण करत आहे. मात्र काल अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या भाषणांनी राऊतांचा बुरखा फाडण्याचं काम केलं. संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे लोक असं भासवत होते की पाटन्यामध्ये भाजपविरोधात मोठा प्लॅन झाला आहे,भाजप आणि मित्रपक्षांना आता हरवणार. मात्र हा आव आणणार्यांचं वस्त्रहरण करण्याचं काम प्रफुल्ल पटेलजींनी केलं.""त्यांनी तिथे स्पष्ट सांगितलं की, स्वतः शरद पवारसाहेब वारंवार त्यांना सांगत होते की, नरेंद्र मोदींशिवाय भारताला नेतृत्व नाही. मग कुठल्या विचारांनी विरोधकांच्या बैठका व्हायच्या? ज्यांनी महाविकास आघाडी उभी केली तेच जर अप्रत्यक्षपणे मोदीजींना मानत असतील, तर दुसर्यांना काय किंमत आहे?" असा टोला नितेश राणेंनी राऊतांना लगावला.
Comments
Post a Comment