मोठी बातमी ! 50 वर्षांपासून धगधगत असलेला बेळगाव सीमाप्रश्‍न सुटणार..?


 जिल्‍ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांची माहिती अचानकपणे ग्रामविकास विभागानं मागवून घेतल्याने ग्रामपंचायत विभागाची एकच तारंबळा उडाली. सायंकाळपर्यंत सीमेलगत असणा‍ऱ्या चंदगड, गडहिंग्‍लज, कागल व शिरोळ तालुक्यातील ६९ गावांची माहिती संकलित केली.या गावांच्या विकासाशी संबंधित गाव विकास आराखडे ग्रामविकास विभागाला सादर केले. सीमाप्रश्‍‍नाच्या अनुषंगाने ही माहिती घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित गावांना केंद्र शासनाकडून दिलेल्या योजना, त्यासाठीचा निधी व त्यातून केलेली विकासकामे यांच्या माहितीचा समावेश आहे. अशाच पद्ध‍तीने राज्याने दिलेल्या योजनांची माहितीही सादर केली आहे.

मागील ५० वर्षाहून अधिक काळ सीमाप्रश्‍‍न धगधगत आहे. सर्वोच्‍च न्यायालयात यावर सातत्याने सुनावणी होत आहे. दोन्‍ही राज्यातून सीमाभागावर दावे केले जात आहेत. यामध्ये केंद्र शासनाची भूमिका निर्णायक राहणार आहे. या सर्व पा‍‍र्श्‍वभूमीवर जिल्‍ह्यातील कर्नाटक सीमेलगतच्या गावांची माहिती मागवली. यामध्ये विशेषत: गाव विकास आराखड्याची मागणी केली आहे.

या आराखड्यात गावांच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली आहे. ग्रामविकास विभागाने मागवलेल्या या माहितीचा नेमका वापर कोणत्या कारणासाठी होणार आहे, याबद्दल मात्र कमालीची गुप्‍तता पाळली आहे. चौकशी करुनही याबद्दलचा तपशील सांगितलेला नाही.

सर्वोच्‍च न्यायालयात सीमाप्रश्‍‍नाबाबत सुरु असलेल्या खटल्याच्या अनुषंगाने ही माहिती मागवली असल्याचीही चर्चा आहे. तसेच केंद्र शासनाकडून या गावांना अधिकचा निधी दिला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुढील दोन-तीन दिवसात या माहितीमागचे नेमके कारण स्‍पष्‍ट होणार आहे.

कर्नाटक सीमेलगत असणा‍ऱ्या गावांची माहिती सादर केली आहे. यामध्ये गावांच्या विकासाचा २०२३-२४ चा गाव कृती आराखडा तयार केला आहे. हा आराखडा ग्रामविकास विभागाकडे पाठवला आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावांना मिळालेला निधी तसेच राज्यांनी दिलेल्या निधीच्या माहितीचा समावेश आहे.

-अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

तालुकानिहाय गावे

  • गडहिंग्‍लज (१९) ः बड्याचीवाडी, शेंद्री, हनिमनाळ, हसूरचंपू, माद्याळ, मुत्‍नाळ, हिटणी, नांगणूर, आरळगुंडी, कडलगे, इदरगुच्‍ची, चंदनकुड, हलगर्णी, तेरणी, कवळीकट्टी, बुगडीकट्टी, लिंगनूर तर्फ नेसरी, हेब्‍बाळ, जलद्याळ, हडलगे.

  • चंदगड- (१६) ः शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, देवरवाडी, सुरुते, ढेकोळी, तुडिये, म्‍हाळुंगे खालसा, कोलिक, कौलगे, होसूर, किटवाड, कामेवाडी, राजगोळी खुर्द, महिपालगड, राजगोळी बुद्रुक, खन्‍नेहट्टी (कुदनूर).

  • कागल- (१८) ःअर्जुनी, करनूर, करड्याळ, कापशी बाळिक्रे, कौलगे, गलगले, गोरंबे, चिखली, जैन्याळ, बाळेघोल, म्‍हाकवे, लिंगनूर कापशी, लिंगनूर दुमाला, वंदूर, शेंडूर, शंकरवाडी, सुळकुड, हणबरवाडी.

  • शिरोळ- (१६) ः शिवनाकवाडी, अब्‍दुललाट, लाटवाडी, घोसरवाड, दतवाड, जुने दानवाड, टाकळी, राजापूरवाडी, खिद्रापूर, राजापूर, अकिवाट, बस्‍तवडे, आलास, गणेशवाडी, शेडशाळ व कनवाड.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..