"INDIA एकत्र आल्याने मोदींना NDA ची आठवण; बाप, काका अन् पार्टी चोरणारे हेच चोर"

 


काल २६ पक्षांची बैठक झाली, हे सर्व पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात रुजलेले आहेत. विरोधकांची बैठक पाहून मोदींना NDA ची आठवण झाली. गेल्या ९ वर्षात आठवण झाली नव्हती. मित्रपक्ष, सहकारी आठवले नव्हते. पण आम्ही बंगळुरू, पाटणात एकत्र आल्याने मोदींना NDA आठवली. याबद्दल त्यांच्या सहकारी पक्षाने मोदींचा सत्कार केला पाहिजे. विरोधक एकत्र आलेत ही भीती आहे. मोदी इज इंडिया हा इंडियाचा अपमान नाही का? भाजपा म्हणजे इंडिया नाही. प्रत्येक व्यक्ती देशाचा इंडिया आहे. भ्रष्टाचाराचे संघटन असल्याचा आरोप करतात. पण ७० हजार कोटींचा आरोप असणारे बाजूला घेऊन उभे करताय. या देशातला प्रत्येक नागरिक इंडिया आहे. भारताचा विजय होईल अन् भाजपाचा पराभव अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.संजय राऊत म्हणाले की, NDA ची आठवण तुम्हाला आता झाली, आम्ही एकत्र आलो म्हणून तुम्हाला मित्रपक्ष आठवले. हा INDIA तुमच्या हुकुमशाहीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. इंडिया, भारत, हिंदुस्तान जिंकणार, हुकुमशाहीचा पराभव होईल. हिंमत असेल तर एनडीएने भारताचा पराभव करून दाखवा. अमित शाहदेखील जेलमध्ये गेले होते. अजित पवार, हसन मुश्रीफ जेलमध्ये जायला निघाले होते. सगळे जामिनावर सुटलेले लोक आहेत असा आरोप त्यांनी केला.

तसेच इंडिया आमचा परिवार आहे. देशात ज्यारितीने हुकुमशाही सरकार चालवले जातेय त्याविरोधात इंडिया लढणार आणि जिंकणार. तुम्ही इंडियाविरोधात षडयंत्र करत आहात. तुमच्यासोबत असणाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सिंचन घोटाळा, इक्बाल मिर्चीसोबत असणारे एकत्र आले. इंडिया एकत्र आल्यावर एनडीएची आठवण झाली. विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. सर्वात मोठे चोर हेच... दरम्यान, अजित पवारांची पार्टी कोणती? सर्वात मोठे चोर हेच, बाप, काका चोरणारे, या चोरांना घेऊन NDA बनली आहे. अजित पवारांकडे कोणती पार्टी आणि खासदार आहेत. मी गांधींचा भक्त, ना मी वाईट करतो, ना वाईट बघतो पण वाईटाचा अंत करतो असा इशारा खासदार संजय राऊतांनी दिला.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..