केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल (शनिवार) संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. आज ते पिंपरी-चिंचवड येथील मोरे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहे. अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर राहणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील पुण्यात आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. 'जे डब्ल्यू मैरियट' हॉटेलमध्ये राज्यातील दोन्ही नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी एक महत्वाची बैठक देखील पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या तिसऱ्या विस्तारावर चर्चा झाल्याची शक्यता तर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार आणि समर्थक आमदारांनी मंत्रीपदीची शपथ घेतली. त्यानंतर खातेवाटप झाले. मात्र, महायुती सर...
Comments
Post a Comment