शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; आखली नवी रणनिती
https://www.highrevenuegate.com/ms14vmar8n?key=5c5d0030f3bf513a8d7189921933de6e
शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत; आखली नवी रणनिती
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अॅक्शन मोडवर आले आहेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसोबत स्वत:शरद पवारांनी संपर्क साधला असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. लवकरच अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गेलेले आमदार परत येतील, असा शरद पवार यांना विश्वास आहे. त्यामुळे पवारांनी आमदारांसोबत संपर्क साधला असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, राजभवनावर जाऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर ८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार हे शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अजित पवार सरकारमध्ये सामील होताच, या गोष्टीला आमचा कोणताही पाठिंबा नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केलं. 'अजित पवारांसह ९ सदस्यांविरोधात अपात्रतेची कारवाई होणार' अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या इतर ८ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातील मागणीची याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आम्हाला माहीत झालं. त्याच क्षणी ते अपात्र ठरले. आम्ही अपात्रतेची याचिका काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ती प्रत इमेलद्वारे पाठवली आहे. 'अपात्रतेच्या याचिकेची प्रत पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. त्यांना मेसेज केलाय. व्हॉट्सअॅपवरही कॉपी पाठवली आहे. अपात्रतेची याचिका प्रत्यक्ष देण्याची व्यवस्था केली आहे', असंही जयंत पाटील यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले
Comments
Post a Comment