''महिनाभर टोमॅटो खाल्लं नाही तर प्रोटीन कमी होणार नाही'' धनंजय मुंडेंचा सुनिल शेट्टीला टोला

  


२ जुलै रोजी राष्ट्रवादीतील आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. काल त्या ९ मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलं. धनंजय मुंडे यांच्याकडे पहिल्यांदाच कृषी खातं आलेलं आहे. आज त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी पहिलीच आढावा बैठक घेतली.आज धनंजय मुंडे यांचा वाढदिवस आहे. परंतु त्यांनी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचा निश्चय केला. बैठकीनंतर बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की, कृषी मंत्रीपदाची माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. स्वाभाविकच शेतीचं आणि माझं आगळंवेगळे नातं आहे. मी पहिल्यांदा कृषी मंत्री झाल्यानंतर खूप खूश आहे, त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली.

मुंडे पुढे म्हणाले की, आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येणार आहेत. सुरुवातीला 'लॉटरी सिस्टीम'नुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ''पर्जन्यमान लांबलंय, तसं या पुढच्या काळात लांबायला नको. किती ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे, या अनुषंगानेही चर्चा करण्यात आलेली आहे. एक रुपयांमध्ये विमा योजना दिली जात आहे. विमा योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असं आवाहन आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा आणि जर हमीभावापेक्षा जास्त रेट जर मिळत असेल तर कुणालाही नाराज व्हायचं कारण नाही.'' 

टोमॅटोच्या वाढत्या दराबद्दल बोलतांना मुंडे म्हणाले, टोमॅटोचे दर वाढले म्हणून काही लोकांनी आंदोलनं केलीत. जर एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगले आहे. त्या बाबतीत राजाकरण व्हायला नको. एक महिना टोमॅटो नाही खाल्ले तर प्रोटीन कमी होणार नाही, असं म्हणून धनंजय मुंडे यांनी अभिनेता सुनिल शेट्टीला टोला लगावला.

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..