'त्यांच्या हातात स्टुडिओ देऊ नका',अखेरच्या ऑडीओ क्लिपमध्ये नितीन देसाईंची PM मोदींना भावनिक साद..
कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी काल बुधवारी त्यांच्या एन.डी. स्टुडीओमध्ये आत्महत्या केली. त्यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. नितीन चंद्रकांत देसाईंच्या निधनाने अनेक मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.
नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर पोलीस तपास करत आहेत. अशातच पोलीसांना N D Studio मध्ये देसाईंच्या ऑडीओ क्लिप सापडल्या. यात त्यांनी महत्वाचा खुलासा केला.
नितीन देसाईंच्या ऑडीओ क्लिपमध्ये मोदींना विनंती
नितीन देसाईंनी त्यांच्या N D Studio मध्ये गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलं. या ठिकाणी काही ऑडीओ क्लिप सापडल्या. या ऑडीओ क्लिपमध्ये त्यांनी मनातलं दुःख सांगीतलं आहे.
एन.डी. स्टुडीओ मराठी माणसाचं स्वप्न. उभं केलेलं कलामंच. ते बॅंकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका. राज्य सरकारने एन.डी. स्टुडीओचा ताबा घ्यावा. कलावंतांसाठी भव्य कलामंच उभारावं. अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केली होती.
नरेंद्र मोदींनी केलेलं कौतुक
नरेंद्र मोदींची २००३ ला मुंबईत सभा होती. तेव्हा सभेच्या जाहीर भाषणासाठी मंच बनवायची जबाबदारी नितीन देसाईंवर होती. त्यावेळी मोदीजी भाषणादरम्यान म्हणाले, की इथे उपस्थित असलेले एक लाख लोक हे नरेंद्र मोदी यांना भेटायला आले आहेत तर दीड लाख लोक हे माझे मित्र नितीन देसाई यांनी बनवलेला हा भव्य मंच बघण्यासाठी आले आहेत.” अशा शब्दात नरेंद्र मोदींनी नितीन देसाईंचं कौतुक केलं होतं
नितीन देसाईंचं अंत्यसंस्कार स्टुडीओतच होणार
नितीन देसाईंनी ऑडीओ क्लिपमध्ये N D Studio बद्दल प्रेम दर्शवलं आहे. नितीन देसाई ऑडीओ क्लिपमध्ये म्हणतात.. माझ्यापासुन N D Studio कधीही दूर करु नका. माझे अंत्यसंस्कार सुद्धा N D Studio व्हावेत अशी माझी इच्छा आहे.
Comments
Post a Comment