गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यात मोठा बदल! सर्व बैठका रद्द; तातडीने दिल्लीला रवाना होणार..

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले आहेत. या दौऱ्यामध्ये अमित शहा यांनी तब्बल ४ तासांची राखीव वेळ ठेवली होती. मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये तातडीने मोठा बदल झाला असून चिंचवडमधील कार्यक्रमानंतर थेट दिल्लीला रवाना होणार आहेत..

याबाबत अधिक माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज संध्याकाळी पुण्यात दाखल झाले आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा तब्बल चार तास वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर हॉटेलमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होणार होत्या. मात्र आता त्यांच्या या दौऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या असून अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

अमित शाह यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार,
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे चिंचवडमधील कार्यक्रमानंतर अमित शहा यांनी तब्बल चार तासांची वेळ राखून ठेवली होती. त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Comments

Popular posts from this blog

BREAKING:अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. तुम्ही तुमची ताकद दाखवा..ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..