पतीचा अश्लील व्हिडिओ सापडला, पत्नीने सोशल मीडियावर व्हायरल केला; उडाली खळबळ
चंदगड : शिनोळी येथील एका नामांकित कंपनीच्या कामगारांने महिला कामगाराला आंबोली दर्शन घडवत तिच्याशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ कामगाराच्याच पत्नीने व्हायरल केल्यामुळे चंदगड तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शिनोळी येथील एका कंपनीत महिला कामगाराचीही भरती करण्यात आली आहे. पण काही कामगार या मुलींशी लगट करत असल्याचा आरोप होत आहे. कंपनी प्रशासनाचा डोळ्यात धूळफेक करत काही कामगार हे महिला कामगारांशी लगट करत असल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. कंपनीतील एका कामगारांने संबंधित महिलेला आंबोलीला नेऊन तिच्याशी अश्लील चाळे करून त्याचा व्हिडिओ केला. तो व्हिडिओच कामगाराच्या पत्नीला सापडल्याने तिने तो सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
Comments
Post a Comment