खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा "शरद पवार"

 



अजित पवार यांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळेंची एका शब्दात प्रतिक्रिया ..

https://www.highrevenuegate.com/ms14vmar8n?key=5c5d0030f3bf513a8d7189921933de6e

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, अजित पवारांच्या बंडखोरीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या बंडखोरीवर एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शरद पवारांचा १३ सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण? या प्रश्नावर स्वत: शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चं नाव घेतलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी ‘प्रेरणास्थान’ (Inspiration) असं एका शब्दात आपली भावना मांडली आहे. सुप्रिया सुळेंचं हे ट्वीट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. खरं तर, अजित पवारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका पत्रकाराने शरद पवारांना विचारलं, राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण वाटतो? यावर शरद पवारांनी स्वत:चा हात उंचावत आणि स्मितहास्य करत ‘शरद पवार’ असं उत्तर दिलं आहे. हाच व्हिडीओ सुप्रिया सुळेंनी ट्विट केला असून ‘प्रेरणास्थान’ असं कॅप्शन लिहिलं आहे.

https://www.highrevenuegate.com/q1h3bgxe7?key=1cf937dfa774d7898aae336efbe9c3c9

Comments

Popular posts from this blog

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..

सरकारी रुग्णालयांत 15 ऑगस्टपासून सर्व वैद्यकीय सेवा मोफत; सरकारचा मोठा निर्णय

Breaking-:मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना अखेर जामीन मंजूर..