...विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय'; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर भाजपची खोचक टीका



 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरूवात होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज विदर्भ दौऱ्यानं केली आहे. आजपासून ते दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. दरम्यान ठाकेरेंच्या या दौऱ्यावर भाजपकडून जोरदार निषणा साधण्यात आला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. "सत्ता असताना अडीच वर्षांत अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते उद्धव ठाकरे आता तब्बल दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना कधीही विदर्भातील जनतेची आठवण झाली नाही; आता मात्र विदर्भाचा पुळका आलेला दिसतोय."

"सत्तेवर असताना मंदिरं बंद ठेवून मदिरालय सुरू करणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता मंदिरांत दर्शनासाठी जावं लागतंय. उद्धव ठाकरे आता तुम्ही कितीही दौरे केले तरी तुमचं ढोंगी राजकारण आणि सत्ता गेल्यामुळे सुरू असलेली नौटंकी जनता ओळखून आहे." असेही ते म्हणाले आहेत.

"उद्धव ठाकरे तुम्ही विदर्भाच्या दौऱ्यावर आलाच आहात तर भाजपसोबत गद्दारी करून, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व सोडून तुम्हाला काय मिळालं हेही एकदा जनतेला सांगून टाका." असा टोला देखील बावनकुळे यांनी लगावला आहे.

Comments

Popular posts from this blog

BREAKING:अमित ठाकरेंची कार अडवली; संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धीवरील टोलनाका फोडला

आम्ही आमची ताकद दाखवून देऊ. तुम्ही तुमची ताकद दाखवा..ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव

CM शिंदेंसह, अजित पवारांची शहांसोबत चर्चा ; पुण्यात मध्यरात्रीपर्यंत नेत्यांमध्ये खलबतं..